सन्मान महानायकाचा
दिल्ली:
राजपथ येथील इंडीया गेट समोरील मखरीमध्ये महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त होलोग्राम प्रतिमेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले.
नव्या भारताचे दर्शन घडविणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचा भाजप तळेगाव शहराच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला..
या वेळी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराचे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनात आव्हाने आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान या बद्दल सविस्तर माहिती दिली.
सरचिटणीस रविंद्र साबळे यांनी हिदुस्थानच्या या निर्णयाचे स्वागत करून स्वातंत्र्यसेनानींना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच योग्य तो बहुमान देते आहे असे सांगुन सरकारचे आभार मानले..
यावेळी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराचे सरचिटणीस प्रदीप गटे,विनायक भेगडे,श्रीमती रजनी ठाकुर,मा.नगरसेविका शोभा भेगडे,अ.जा.मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव कांबळे,कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे,कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे,सोशल मिडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक,शहर उपाध्यक्ष संजय जाधव,सचिन आरते,ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष गणेश उंडे,ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत,उपाध्यक्ष डॉ.केंकरे,प्रज्ञा आघाडी अध्यक्ष पद्मनाभ पुराणिक,भाजयुमो सरचिटणीस पद्मभूषण डंबे,सचिव ललीत गोरे,कामगार आघाडी सरचिटणीस आनंद पूर्णपात्रे,उपाध्यक्ष सतीष पारगे,ज्ञानेश्वर गुंड,हे उपस्थित होते.यावेळी शहरातील नागरिकांना पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला.
भारत माता कि जय,वंदे मातरम आणि नेताजींच्या जयघोष करण्यात आला.

error: Content is protected !!