मावळमित्र न्यूज विशेष:
राजकीय आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा लाभलेल्या टाकवे बुद्रुकच्या असवले परिवारातील शिवाजी असवले आंदर मावळातील बुलंद नेतृत्व.अपयशात खचून न जाता तितक्याच क्षमतेने सर्वसामान्य मध्ये घुसून काम करणारा युवक नेता. पाठीवर जबाबदारीचे ओझे घेऊन जाताना,जनसामान्यांपर्यंत असलेली आपुलकीची नाळ अधिक घट्ट ठेवीत ती जोपासणारा युवक कार्यकर्ता.
ज्या वयात हौसमौज करायची त्यातच वयात महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीत ठेकेदारीत काम करणारा कंत्राटी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचायत समितीचा उमेदवार हा प्रवास राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुण पिढी समोर आदर्श आहे.
अपयशात पडून न रहता त्याच्या मानेवर बसून लढणारा हा तरूण धडपड्या स्वभावाचा आहे. शिवाजीराव यांचे वडील कै.चिंधू मारूती असवले टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते. पंधरा वर्षे त्यांनी ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व केले. माजीमंत्री मदन बाफना साहेब व माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब यांचे कट्टर समर्थक असलेल्या कै.चिंधूकाका असवले यांचे पंचक्रोशीत आदर्श नाव.
त्यांची शेतीशी जोडलेली नाळ.शिवाजी सर्वात धाकटा मुलगा. जबाबदारीचे भान असलेला शिवाजीचे महिंद्रा कंपनीत ठेकेदाराकडे काम करायचा. त्यात दरम्यान त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायातील पुरेशा अर्थार्जन नंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय राहिले.
आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस ही पक्ष संघटनेतील पदे भूषवित राष्ट्रवादी विचारांची कास धरणा-या या युवक मित्राला मागील पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली. अगदी मोजक्या मताने झालेला पराभव.पराभव हा पराभवच असतो.
हा पराभव पचवून तितक्याच क्षमतेने सक्रीय असलेल्या शिवाजीराव असवले स्थानिक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी ताई याही टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होत्या.
राजकीय व सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असणारे शिवाजीराव असवले यांनी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली असून इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले आहे. जिथे ज्ञानदानासह स्थानिक तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
राजकारणातील तरूण पिढीचे नेतृत्व करणा-या शिवाजी भाऊचा २३जानेवारी जन्मदिवस. या दिवशी दरवर्षी विधायक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याची त्यांची परंपरा याही वर्षी कायम असणार आहे.या तरूण मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऐवढेचे म्हणावे वाटते
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! (शब्दांकन-दत्तात्रय सदाशिव गायकवाड, संचालक राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, टाकवे बुद्रुक)

error: Content is protected !!