
कुणे ना.मा येथील जिल्हा परिषद शाळेत वह्यावाटप
लोणावळा:
लोणावळा खंडाळा ही मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असणारी थंड हवेची ठिकाणे.येथे मुंबईहून अनेक पर्यटक येतात.लोणावळ्यातील चिक्कीची तर सर्वांनाच भूरळ पडते.अनेक मुंबईकरांनी तर येथे घर विकत घेतलेले आहे.विकेंडला हमखास लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे गजबजलेली असतात.
याच खंडाळ्याजवळील कुणे ना.मा येथील जिल्हा परिषद शाळा ही खूप उपक्रमशील आहे.या शाळेजवळून जात असताना नवी मुंबई येथील मा.उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रति असणारी तळमळ पाहिली.त्यांच्या शिक्षणप्रक्रियेतील अडीअडचणी जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके,गणवेश प्राप्त होतात.परंतु पुरेशा वह्यांअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे पाहून सुमारे २५००० रु.किंमतीच्या वह्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दिल्या.नुकताच मोफत वह्या वाटपांचा हा कार्यक्रम शाळेत पार पडला.यावेळी त्यांचे कुटुंबीय,मा.सरपंच संदीप उंबरे,अनिल पिंगळे,मुख्याध्यापक सहादू मानकर,शिक्षक सुषमा ढोबळे,मंगल भेस्के,मीना शिंदे,विलास वरे इ.मान्यवर उपस्थित होते.
जगन्नाथ सिन्नरकर यांच्यासारखे दानशूर व्यक्ती समाजात निर्माण झाल्यास नक्कीच समाजहीत साधले जाईल अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक सहादू मानकर यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील गतिरोधक दूर करण्याचा प्रयत्न मोफत वह्यावाटप करुन केल्याचे मत जगन्नाथ सिन्नरकर यांनी व्यक्त केले.सिन्नरकर कुटुंबीयांच्या या सामाजिकतेचे लोणावळा परिसरात कौतूक होत आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







