चाकण:
कंपनीतील कच्चा माल वाहतुकीसाठी विश्वासाने दिलेल्या ९० ट्रॉल्यांपैकी ७२ ट्रोल्यांचा अपहार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.य१ नोव्हेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीत हा अपहार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून संतोष तुळशीराम भिसडे (वय ३३, रा. बर्गे वस्ती, चिंबळी फाटा, ता खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत भारत मांजरे (वय ३७, रा. वडाचा मळा, देहूगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट आमेय कंपनी कुरुळी फाटा ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी निघोजे येथे ने आण करण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपी संतोष यांच्याकडे विश्वासाने ९०ट्रॉल्या दिल्या होत्या. १ नोव्हेंबर २०२१ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीत संतोष याने त्यातील चार लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ७२ ट्रॉल्यांचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली. महाळूंगे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर हे पुढील तपास करीत आहेत.
चोरी केलेल्या या ट्रोल्या गेल्या कुठे,कोणाचा वरदहस्तावर ट्रोल्या गायब अशी चर्चा औद्योगिक नगरीत सुरू असून चाकण,रांजणगाव,तळेगाव एमआयडीसीत अशाच प्रकारे ट्रोल्या चोरीला गेल्या आहेत की काय याची चाचपणी कारखाने करून लागले असून चोरी झालेल्या ट्रोल्या शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन आहे.
वाहन चालक अशा ट्रोल्या चोरीत असल्याचे या तक्रारीवरून पुढे आलेली बाब औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांसाठी चिंतेची बाब असल्याचे कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!