आढले खुर्द येथील तरुणाचा गोळीबारात मृत्यू.
सोमाटणे :
मावळ तालुक्यातील आढले खुर्द गावात किरकोळ वादातून एक तरुणाकडून दुसऱ्या तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. हा खळबळजनक प्रकार आज शुक्रवार (दि. २१) रोजी सकाळच्या सुमारास घडला.
असून यामध्ये रोहन चंद्रकांत येवले गंभीर जखमी झाला. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!