आंदर मावळातील टाकवे-फळणे व बेलज येथील नळ पाणी पुरवठा योजनांसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध
टाकवे बु. : आंदर मावळची मुख्य बाजारपेठ असलेल्या टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गावे व वाड्या -वस्त्यांवर नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतुन जल जीवन मिशन अंतर्गत तीन नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि.१९) महिलांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, पीएमआरडीए सदस्या व कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर,ज्येष्ठ नेते काळूराम मालपोटे, आंदर मावळ अध्यक्ष मारुती असवले , राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष अंकुश आंबेकर, सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा असवले, ऋषीनाथ शिंदे, अविनाथ असवले, प्रतीक्षा जाधव,प्रिया मालपोटे ,संतू दगडे, संध्या असवले, ज्योती आंबेकर, सोमनाथ असवले,आशा मदगे, जिजाबाई गायकवाड तसेच महिला भगिनी, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत टाकवे बु. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे १ कोटी १८ लाख रुपये, फळणे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३७ लाख ६९ हजार रुपये व बेलज नळपानी पुरवठा योजनेसाठी सुमारे २४ लाख २५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
औद्योगिक क्षेत्रामुळे वाढते नागरीकीकरण यामुळे भविष्याचा विचार करता या गावांमध्ये होत असलेल्या पाणी योजनांमुळे प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.

error: Content is protected !!