आमदर सुनील शेळके यांच्या कडून बेलज- टाकवे बुद्रुक रस्त्याच्या कामाची पाहणी
टाकवे बुद्रुक :
टाकवे बुद्रुक- बेलज येथील नवीन रस्त्याच्या कामाची पाहणी आमदार सुनील शेळके व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , ज्योती शिंदे सभापती मावळ यांनी केली.
यावेळी रस्ता आधिक मजबूत व्हावा यासाठी उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापर करावा तसेच इस्टीमेन्ट प्रमाणे काम करुन दिलेल्या वेळते काम पुर्ण कशा पद्धतीने होईल याची खबरदारी ठेकदाने घ्यावी असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.
रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४० लक्ष निधी आमदार सुनील शेळके यांनी मंजूर केला आहे
यावेळी टाकवे ग्रामपंचायतीचे सरपंच भुषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,सदस्य सोमनाथ असवले, संताजी जाधव कृषी विस्तार अधिकारी ,सुभाष बांगर ग्रामविकास अधिकारी,कानडे उपअभियंता बांधकाम यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

error: Content is protected !!