मावळमित्र न्यूज विशेष:
गावकारभारातील मानाच्या सरपंच पदाची उंची तर वाढवली .शिवाय प्रथम सरपंच आणि आदर्श सरपंच असा बहुमान मिळवला .इतकेच काय गावाचे नाव राज्याच्या नकाशावर कोरून आपले कौशल्य व कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करून नेतृत्व सिद्ध करणारे संतोष जांभूळकर जांभूळगावचे माजी सरपंच.
सरपंच पदाची ही बिरुदावली आयुष्यभर मिरवणारी असली तरी त्या पाठीशीची पुण्याई मोठी आहे.त्याग,कष्ट,सुस्वभाव,सातत्य,संस्काराचा ठेवाही मोलाचा ठरला आहे.संतोषभाऊ या नावाने लोकप्रिय असलेल्या संतोष जांभूळकर या तरुणाचे बालपण सुख समाधान आणि संस्कारात गेले.मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाच्या नेतृत्वातील महत्वाच्या नावात कै.भगवंत जांभूळकर गूरूजींचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांचे सुपुत्र असलेल्या संतोष यांचे बालपण शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय जडणघडणीच्या संस्कारात गेले.
जांभूळगावच्या प्राथमिक शाळेतील शिक्षणापासून संघटन कौशल्य असलेल्या संतोष यांचे माध्यमिक,महाविद्यालयीन व पदवी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात झाले. संघटन कौशल्याच्या बळावर या मित्राने अनेक जीवाभावाचे सहकारी आणि मित्र कमावले आणि ते तितकेच जपले.
काँग्रेस विचारांच्या तालुक्यातील प्रमुख कुटूंबातील जांभूळकर हेही प्रस्थापित मोठे कुटूंब. त्यांची लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर असीम निष्ठा आणि श्रद्धा .यातूनच संतोष यांची राजकीय जडणघडण सुरू झाली.कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीत जांभूळगावचा समावेश होता .
जांभूळगावला सांगवी गावची जोड देऊन जांभूळगाव स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात संतोष जांभूळकर आणि त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा राहिला .स्वतंत्र झालेल्या ग्रामपंचायतीची पहिली बैठक झाडाच्या सावलीत घेऊन ‘ग्रामविकासाची नांदी ‘त्यांनी येथेचे सुरू केली. गावकारभारातील मूलभूत गरजा पूर्ण करीत जांभूळगाव कधीच स्मार्ट व्हिलेज म्हणून उदयास आले. आणि गावाची डेवलपमेंट झाली.
तालुका स्तरावरील विविध पुरस्कार पटकावून जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार जांभूळगावाच्या वैभवात भर टाकणारे ठरेल. आज संतोष जांभूळकर यांचा वाढदिवस,या निमित्त विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यस्त कार्यक्रमात अनेकांच्या शुभेच्छा स्वीकारून भविष्यातील यशस्वी लढाई साठी संतोष या जिवाभावाच्या मित्राला सुयश लाभो यासाठी शाळा व महाविद्यालयातील मित्र मंडळी कडून आभाळभर शुभेच्छा.

error: Content is protected !!