तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक असे बेताल वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पक्ष तळेगाव शहराच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
प्रभारी पोलीस निरिक्षक साळी यांच्याकडे करण्यात आली.या विषयी लीगल ओपिनियन घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे वादग्रस्त विधान करणाऱ्या नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,नगरसेविका शोभा भेगडे,सरचिटणीस रविंद्र साबळे,विनायक भेगडे,भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, सहकार आघाडी अध्यक्ष .संतोष परदेशी,भाजयुमो माजी अध्यक्ष अरुण भेगडे,सोशल मिडीया अध्यक्ष .उपेंद्र खोल्लम,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरचिटणीस विष्णू गुंजाळ,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष ऋषीकेश सुतार,ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत उपस्थित होते.
तत्पूर्वी तळेगाव भारतीय जनता पक्षा तर्फे सांकेतिक आँनलाईन जोडे मारा आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आँनलाईल जोडे मारून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

error: Content is protected !!