टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील भोयरे या गावात वसुंधरा अभियान राबविण्यात आले असुन त्याचबरोबर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त “जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान” राबविण्यात आले.
या अभियाना अंतर्गत निबंध,रांगोळी,वक्रुत्त्व,चित्रकला, कवितालेखन,या स्पर्धांचे लहान,मध्यम व मोठ्या गटांमध्ये आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना मानपत्र व प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
संपुर्ण भोयरे गावातुन प्रभातफेरी काढून प्लास्टिक मुक्त गाव,घनकचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन,जलसंवर्धन आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली.प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा ही काळाची गरज आहे.झाडे लावा झाडे जगवा,ओला कचरा सुखा कचरा वेगळा करा,आपला परिसर स्वच्छ ठेवा,पाणी आडवा पाणी जिरवा,जलसंवर्धन,स्वच्छतेचे महत्व,शौचालयाचे महत्व याबाबत शाळेतील मुलांना माहिती देण्यात आली.
यावेळी भोयरे गावचे विद्यमान सरपंच श्री.बळीराम भोईरकर,उपसरपंच सौ.मंगला आडिवळे,ग्रा.पं.सदस्य तानाजी खडके,मीराबाई जांभुळकर,ग्रामसेविका सौ.प्रमिला सुळके मॅडम,अंगणवाडी सेविका मंदाताई आडिवळे,रुपाली भोईरकर,आशा खडके व जि.प.प्रा.शाळा व हायस्कुलचे सर्व शिक्षक,ग्रा.कर्मचारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!