शाफलर इंडिया व दीप फाऊंडेशनच्या सहकार्याने निगडे शाळेस टॅब भेट
तळेगाव स्टेशन
कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात मागील दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाईन शिक्षणास प्राधान्य दिले जाते.मात्र निगडे गावातील ठाकरवाडी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल अभावी ऑनलाइन शिक्षणात अडथळे येऊन हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत असल्याने शाफलर इंडिया कंपनीच्या वतीने आणि दीप फाउंडेशनच्या सहकार्याने आज निगडे शाळेस टॅब देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी कंपनीच्या वतीने ज्योती गाते, सतीश थरकुडे हे उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भांगरे यांच्या वतीने या मान्यवरांचे आभार मानण्यात आले.उपाध्यक्ष साहेबराव देशमुख यांनी यापुढेही कंपनीच्या वतीने असेच सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.ज्योती गाते यांनी यापूर्वी शाळेस करण्यात आलेल्या मदतीचा लेखाजोखा थोडक्यात सांगितला.
या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे माजी अध्यक्ष साहेबराव भांगरे तसेच शाळा समितीचे सदस्य व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अजिनाथ शिंदे यांनी केले.आभार शाळेचे मुख्याध्यापक मस्तूद मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!