टाकवे बुद्रुक:
युवा पर्व फाउंडेशनचे संस्थापक कैलास गायकवाड यांच्या वतीने भोयरे प्राथमिक शाळेला बांधकामासाठी मदत करण्यात आली
भोयरे ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयरे” या ठिकाणी “.मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ,संस्थापक युवा पर्व फाउंडेशन मावळ कैलास गायकवाड यांच्या वतीने बांधकामासाठी एक गाडी क्रसॅण्ड देण्यात आली.
दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर तात्काळ त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली.
यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, भोयरे सरपंच बळीरामभाऊ भोईरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ भोईरकर, आदिनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष भास्कर लखिमले, पांडुरंग भोईरकर,उपाध्यक्ष राजु करवंदे, विकास अडिवळे, गुलाब भोईरकर, अजय अडिवळे, निखिल भोईरकर, मुख्याध्यापक विरणक सर, तानाजी शिंदे सर, मोहन भोईरकर सर, खुरसुले सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!