कोल्हापूर :
शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रा. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, कामगार चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या निधनाने शोषित, वंचितांचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एन. डी. पाटील यांनी अनेक लढ्यांचे नेतृत्व केलं असून महाराष्ट्राचा एक पुरोगामी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

error: Content is protected !!