घराघरात थंडी,ताप,
खोकल्याचा कहर झालाय
सावध रहा बाबांनो
पुन्हा कोरोना आलाय
जलमाची थंडी
अन् त्यात कोविडचा ताप
क्वारंटाईनच्या भितीने
अंगाचा होतो थरकाप
मास्क वापरुन वापरुन
चपटं झालं नाक
जवळ कुणा बोलावण्या
ओमिओक्रॉनचा धाक
सामाजिक अंतराचा
येतोय खूप कंटाळा
दार हाय उघडं
पण घराला मात्र टाळा
शाळा बंद झाल्या
पोरही हिरमुसली
अॉनलाईन अभ्यासाने
मोबाईल घेऊन बसली
कधी व्हायच्या यात्रा
अन् कधी व्हायचे सण
कोरोना हद्दपार झाल्यावर
प्रसन्न होईल मन
पिंजऱ्यातल्या पक्ष्याचे
देवा लवकर उघड दार
जुन्या अच्छ्या दिनांवरती
होऊन जाऊ दे स्वार
कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करुन सामाजिक हीत जोपासा….

—— श्री.उमेश जनार्दन माळी ( सर ) ——

error: Content is protected !!