
मावळ तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराने श्रीम.संगिता धन्वे सन्मानित
वडगाव मावळ:
पंचायत समिती,मावळ सभापती,उपसभापती व सदस्य यांनी आयोजित केलेल्या ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण’ समारंभात शिंदेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता धन्वे यांना सन्मानित करण्यात आले.राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाजपा राज्य उपाध्यक्षा चित्राताई वाघ,मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,मा.आमदार दिगंबरदादा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,भास्करराव म्हाळसकर,सभापती ज्योती शिंदे,मा.उपसभापती दत्तात्रय शेवाळे,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,शांताराम कदम,सुवर्णा कुंभार,निकीता घोटकुले,जिजाबाई पोटफोडे इ.मान्यवर उपस्थित होते.
श्रीम.संगिता धन्वे या उपक्रमशील शिक्षिका असून पाढे पाठांतर,सुलेखन,कृतीयुक्त अध्यापन इ.माध्यमातून त्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवलेला आहे.
यापूर्वी त्यांना शिवसेनेचा व सुदामभाऊ कदम प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराने आंदर मावळात कौतूक होत आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







