जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत कडधे येथील अक्षय तुपे प्रथम
पवनानगर:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत जिल्हा परिषद पुणे येथे झालेल्या मोठ्या गटातील सामान्यज्ञान स्पर्धेत कडधे येथील चि.अक्षय लहू तुपे याने प्रथम क्रमांक मिळवून मावळ तालुक्याचे नाव जिल्हाभर गाजवले.त्याला ११५ गुण प्राप्त झाले.इ.सातवीचे वर्गशिक्षक श्री.शंकर बगडे यांनी त्याची सामान्यज्ञानाची तयारी करवून घेतली होती.
वर्तमानपत्र,पुस्तकवाचन तसेच विविध चर्चेतून त्याने सामान्यज्ञान वाढवण्याचा सराव केला.सामान्यज्ञान चांगले असलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत नेहमी चमकतात असे मत केंद्रप्रमूख श्री.रामराव जगदाळे यांनी व्यक्त केले.कडधे शाळा ही उपक्रमशील केंद्रशाळा असून अक्षयचे यश हे निश्चितच सुखावणारे आहे अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक श्री.गणेश कदम यांनी दिली.सामान्यज्ञानाचा अभ्यास वाढवून भविष्यात स्पर्धा परीक्षा देणार असल्याचे मत अक्षय याने व्यक्त केले.
तालुकास्तरीय स्पर्धेतील या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी श्री.बाळासाहेब राक्षे,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.रजनी माळी,कडधे येथील सरपंच सौ.कुसूमताई केदारी,उपसरपंच श्री.बजरंग तुपे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मोनाली तुपे,उपाध्यक्षा सौ.सोनाली तुपे,मा.अध्यक्ष श्री.गोरख खराडे,मा.उपाध्यक्ष श्री.नितीन तुपे,शिक्षक श्री.धनंजय नवले,श्री.संजय ठुले,श्रीम.प्रज्ञा माळी यांनी अभिनंदन केले.अक्षयच्या या यशाबद्दल पवनमावळ परिसरात सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!