
कामशेत:
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा व ग्रामपंचायत सदस्य अंजना विकेश मुथा यांच्या पुढाकारातून शहरासह पंचक्रोशीत दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. मकरसंक्रांतीच्या पूर्वेला शहरासह ग्रामीण भागात दिनदर्शिका व तिळगुळाचे वाटप करून मुथा दांपत्याने संक्रातीचा गोडवा वाढवला.
पंचक्रोशीतील वारकरी वाघू शिंदे,बाळासाहेब वाघुले, सोपान दाभणे, शामराव गाढवे,नामदेव ननवरे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शहरातील गावठाण,देवराम कॉलनी,इंद्रायणी काॅलनी, सहारा काॅलनी, दत्त काॅलनी, भीमनगर, बाजारपेठ,शायरी,दौंडे काॅलनीत घरोघरी दिनदर्शिका वाटप करण्यात आल्या.
यावेळेस निलेश मुथा,गणेश भोकरे,सतीश इंगवले,परेश मुथा, कैलास परमार,सुरेखा खैरवाड उपस्थित होते.
डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” आरोग्याशी लढत दोन वर्षे गेले,यंदाची संक्रात सर्वाना सुख,समृद्ध आणि भरभराटीची जावो. आरोग्यदायक शुभेच्छा.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







