टाकवे बुद्रुक:
बेलज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस लायन्स क्लब ऑफ पुणे(फोनिक्स) व टाटा ब्लुस्कोप स्टिल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त येथील शाळेला ई- लर्निंग संगणक कपाट, टेबल, फैन, ट्यूब लाईट अशा शालेय उपयोगी साहित्याचे विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत वाटप करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे यांच्या विशेष पाठपुराव्याच्या प्रयत्नातून लायन्स क्लब ऑफ पुणे(फोनिक्स) व
टाटा ब्लुस्कोप स्टिल प्रा.लि. या संस्थेकडून साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्रथम राजमाता जिजाऊ,व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रज्वलन करून त्यानंतर शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हेमंत नाईक, सतिश राजहंस, अध्यक्ष नरेंद्र पेंडसे,उपाध्यक्ष दिपश्री प्रभू,सचिव प्रसाद दिवान , कविता चेकर, वनिता लकडे, शिक्षा मिश्रा, टाटा ब्लूस्कोप(C.S,R) नरेंद्र प्रभू टाटा ब्यूस्कोप, डॉ. संजय लकडे, सुरेश मुख, वनवासी कल्याण आश्रम, रविंद्र वारे, दिलीप भिलाट यांच्या प्रयत्नातून गरजूवंत विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मदत मिळाली या मिळालेल्या मदतीमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांनी लायन्स क्लब ऑफ पुणे(फोनिक्स) व टाटा ब्लुस्कोप स्टिल प्रा.लि. यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, केंद्रप्रमुख सचिन अंब्रुळे, सरपंच भूषण असवले उपसरपंच परशुराम मालपोटे, माजी उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य अविनाश असवले, माजी उपसरपंच सत्तू दगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत मदगे. आशा मागे, माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राघू मोरमारे, उपाध्यक्ष काशिनाथ दगडे,जयश्री वाजे , सुखदेव गवारी, शिवाजी कोकाटे,यांसह टाकवे जि. प. शाळा मुख्याध्यापक शिवाजी जरग यांसह आदी नागरिक उपस्थित होते.
बेलज शाळेचे मुख्याध्यापक वाबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अर्चना पवार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन शिवदे सर यांनी केले.

error: Content is protected !!