वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा व मावळ पंचायत समितीचा पंचवार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे उपस्थितीत होते.
मावळ पंचायत समिती अंतर्गत कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी,शिक्षक व शिष्यवृत्ती पात्रताधारक विधर्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच मागील पाच वर्षांपासून पंचायत समिती मावळ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी विकासकामांचा लेखाजोखा असणारा पंचवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,जेष्ठ नेते शिवाजीराव पवार संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना,जेष्ठ नेते शांताराम काजळे,जेष्ठ नेते माऊली शिंदे,जेष्ठ नेते निवृत्ती शेटे,पं.स.सभापती ज्योतिताई शिंदे,उपसभापती दत्ता शेवाळे,माज सभापती गुलाब काका म्हाळस्कर,माजी सभापती निकिता घोटकुले,माजी सभापती सुवर्णा कुंभार,माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे,माजी उपसभापती शांताराम कदम,महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे,जि.प.सदस्य अलका धानिवले,मा.जि.प.सदस्य सुमित्रा जाधव,युवा मोर्चा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,ता.सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे,मनोहर भाऊ भेगडे,सहकार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ केदारी,सोशल मिडिया प्रमुख सागर शिंदे आदी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गुणवंतांचे कौतुक करून विकास कामासाठी सहकार्य केलेल्या अभिनंदन केले. गुरुजनांना प्रती आदर व्यक्त केला. चित्रा वाघ यांनी खास शैलीत केलेल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली.

error: Content is protected !!