पवनानगर:
गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रभर सुरू असलेल्या लोहगड किल्ल्यावरील उरसाचा गैर प्रकारा पहावयास मिळत आहे. गेल्या दहा वर्षापासून अशा प्रकारचा उरूस भरवला जातो. इतिहासात कोणत्याही प्रकारचे संदर्भ नसताना हा अनुचित प्रकार कसा घडू शकतो यासंदर्भात वारंवार विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने निवेदन देऊन हा उरूस किल्ल्यावर न होता आता गडाच्या पायथ्याला होऊ लागला आहे .
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला पावन झालेल्या या लोहगडावर अशा प्रकारचे गैरप्रकार होत असल्यामुळे यामुळे शिवभक्तांना मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल करत आहे. या दरम्यान गडावरचं पावित्र्य भंग होतं पशू पक्ष्यांचा बळी दिला जातो गडावर जाऊन नासधूस करण्याचा प्रयत्न असतो असा प्रयत्न झाल्यास झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनप्रक्षोभाला सामोरं जावं लागेल. असे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध झाला असता सदर घटनेचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल पाठपुरावा करत असून अश्या प्रकारचा उरूस या कोरोनाच काळामध्ये कोणत्याही परवानग्या न घेता , पुरातत्त्व खात्याची परवानगी न घेता,कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसताना होऊ नये यासंदर्भात माननीय तहसीलदार आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन अशा प्रकारच्या विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी व अशा प्रकारचा उरूस झाल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल.
या वेळी विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, जिल्हा संयोजक बाळासाहेब खांडभोर, तालुका अध्यक्ष गोपीचंद कचरे, तालुका संयोजक प्रशांत ठाकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!