तळेगाव दाभाडे:
शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी करिता घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.
या गुणवत्ता यादीत सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे या शाळेची विद्यार्थीनी कु ईशिता कुंडलिक शिंदे (इ 5 वी ) ही जिल्हा गुणवत्ता यादीत आली तसेच मराठी माध्यमातून ती मावळ तालुकयात प्रथम आल्याने संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड , उपाध्यक्ष दिलिप कुलकर्णी शिक्षण मंडळ सदस्या डॉ. ज्योती चोळकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. तिला मुख्याध्यापिका विदया अडसुळे मॅडम वर्गशिक्षिका तृप्ती झगडे मॅडम , नितीन शिंदे सर, निलिमा ठाकूर , वृषाली गाडे अनिता कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!