कामशेत:
वैद्यकीय क्षेत्रात करिअरला वाव असल्याने महिला आणि युवतीनी न घाबरता न डगमगता पुढे येऊन स्वतःला झोकून द्या असे आवाहन कवी विं.दा.करंदीकर यांची कन्या व जागृती सेवा संस्थेच्या अध्यक्षा जयश्री काळे यांनी केले.
जागृती सेवा संस्था व महावीर हाॅस्पिटल यांच्या वतीने सुरू असलेल्या परिचारिका प्रशिक्षण शिबीराला त्यांनी भेट दिली त्या वेळी काळे बोलत होत्या.
जागृती सेवा संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता सोमण, जागृती सेवा संस्थेच्या सचिव मंगला पाटील यांनी महावीर हाॅस्पिटल मध्ये सूरू असलेल्या परिचारिका प्रशिक्षण शिबिरास भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी स्वागत केले.

वैद्यकीय क्षेत्रातील
तज्ञ मार्गदर्शक या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार
आहेत. तसेच प्रशिक्षणा नंतर शासकीय
प्रमाणपत्र देखील दिये जाणार असून नोकरीची
हमी महाविर हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणार
आहे. ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा यानी
मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत
आरोग्य सेवे बाबत महिला सक्षमीकरण, महिला
प्रशिक्षण हा शब्द मतदारांना दिला होता. हा शब्द
पूर्ण करण्याच्या हेतूने या प्रशिक्षण शिबिराचे
आयोजन केल्याचे मुथा यांनी सांगितले. प्रथम
नोंदणी करणाच्या आणि किमान दहावी पर्यंत
शिक्षण झालेल्या गरजूंना या शिबिरात संधी दिली
जाणार आहे.
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे,सेवा वृत्तीने या क्षेत्रात काम करणा-यांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहे.यासाठी जागृती सेवा संस्थेच्या वतीने मार्गदर्शन लाभत आहे.

error: Content is protected !!