पवनानगर :
पवन मावळ भागातील पवना विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज येथे ग्रामदूत प्रकल्पाअंतर्गत १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला होता.
तसेच शिक्षकांसाठी अध्यापनशास्त्र या विषयावर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला.
श्री अशोक सिंगल मेमोरियल ट्रस्ट, मुंबई आणि सेवावर्धिनी संस्था, पुणे या दोन संस्थाचा मिळून ग्रामदूत प्रकल्प गेल्या एक वर्षापासून चालू आहे. या प्रकल्पांतर्गत हे मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन समुंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाइम स्टडीज लोणावळा येथील प्राध्यापक महेश थत्ते,लेखक नवीन शिक्षा नितीचे पंकज जयस्वाल, प्राध्यापक श्री रेमन्डस स्वामी,हेमंत पंतगे यांनी केले.
महेश थत्ते यांनी भारतीय सशस्त्र सेनेमधील नोकरीच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर रेमंड यांनी सागरी मार्गात असणाऱ्या जहांज मधील नोकरीच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच पंकज जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर तर शिक्षकांसाठी अध्यापन शास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन वर्गांसाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे संयोजन पवना विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या अंजली दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्वे शिक्षण संस्थेचे विश्वस्त नवनाथ ठाकर,हेमंत पंतगे,राजकुमार वरघडे,सुनिल बोरुडे,भारत काळे, गणेश ठोंबरे,वैशाली पाटील,मोहन शिंदे,ज्योती दौंड,प्रतिभा ढमढेरे व पवना शिक्षण संकुलाच्या शिक्षकांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार वरघडे , गणेश ठोंबरे यानी केले तर आभार सुनिल बोरुडे यांनी मानले.

error: Content is protected !!