
वडगाव मावळ :
मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतिने आदिवासी बांधवांच्या मुलांना स्वेटरचे वाटप करून तसेच आज गुरुवार (दि.६) रोजी सकाळी मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वडगाव मधील कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पत्रकार संघाच्या वतीने आंदर मावळातील करंजगाव येथील कासपठार व डोंगरवाडी यतसेच उकसान पठार येथील आदिवासी विद्यार्थ्यांना समाज बांधवांच्या मुलांसाठी २०० स्वेटरचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये तेथील नागरिकांनाच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
त्याचबरोबर उकसान पठारावरील शिक्षक भाऊ आखाडे यांचे सर्पदंशाने मृत्यू झाला त्यामुळे पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबीयांना पाच हजार रूपये पत्रकार संघाच्या वतीने मदत करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, सुदेश गिरमे, ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश विनोदे दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर ठाकर, हे उपस्थित होते. तर मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष सचिन शिंदे, संकेत जगताप, सचिव चंद्रकांत लोळे, रवी ठाकर, प्रसिद्धी प्रमुख निलेश ठाकर, खजिनदार सचिन ठाकर, योगेश घोडके, चंद्रकांत असवले, सुभाष भोते, बाबुराव काळे, उत्तम ठाकर, अभिषेक बोडके आदी पत्रकार, मल्लिकार्जून कांबळे, अलका निमसे कविता मोरया हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना स्वेटर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता
यावेळी बोलताना शिक्षक मल्लिकार्जुन कांबळे म्हणाले की, या पठारावरील भागतील विद्यार्थी व नागरिक मूलभूत सुविधांपासुन वंचित आहेत या ठिकाणी रस्ता, वीज व पाणी या सुविधा सुध्दां विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेल्या वह्या पेन शाळेचे गणवेश देखील उपलब्ध होत नाही परंतु ग्रामीण मावळ पत्रकार संघाने गरज ओळखून विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







