टाकवे बुद्रुक:
महावितरण मार्फत एक दिवस एक गाव अभियानाअंतर्गत शुक्रवार दि.७ रोजी ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक आंतर्गत टाकवे, फळणे,बेलज या गावातील समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभाग वडगाव मावळचे अधिकारी विवेक सूर्यवंशी व शाम दिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान घेण्यात येणार आहे.
तरी उद्या खालील समस्यांपैकी आपली कशा प्रकारे समस्या आहे ते लेखी स्वरूपात घेऊन अकरा वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय टाकवे बुद्रुक या ठिकाणी नागरिकांनी बहुसंखेने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खालीलपैकी ज्या समस्या आहेत त्या समस्याचे निवारण एक दिवसांमध्ये महावितरणकडून करण्यात येईल असे महावितरणचे अधिकारी यांनी सांगितले आहे.
नवीन वीज जोडणी देणे,,वीज देयक दुरुस्ती,वीज देयक वसुली,नादुरुस्त मीटर बदलणे, ना दुरुस्त सर्व्हिस वायर बदलणे,मीटरची जागा बदलणे,कायम खंडित ग्राहकांची पुनर्तपासणी,शून्य युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणी 0 ते 30 युनिट वापर असलेल्या ग्राहकांची तपासणे,वीज वाहिनी पाहणी करणे व झाडांच्या फांद्या छाटणे,वितरण रोहित्र अर्थिंग करणे वितरण रोहित्र तेल भरणे, जळालेल्या वितरण रोहित्र केबल बदलणे वितरण पेटी दुरुस्त करणे,जीर्ण झालेले खांब बदलणे


वाकलेले उच्चदाब लघुदाब पोल सरळ करणे,लोंबकळणाऱ्या उच्चदाब लघुदाब खेचणे | उच्च दाब / लघुदाब सपोर्ट अर्थिंग करणे.
उच्च दाब लघुदाब वाहिनीला सुरक्षा जाळे लावणे लघुदाब वाहिनीवर पीव्हीसी,स्पेसर लावणे एबी स्वीच आयसो लेटर,देखभाल-दुरुस्ती करणे.
पिन इंसुलटर बदलणे डिस्क इन्सुलेटर बदलणे.
स्टे इंसुलेटर लावणे मिटर रिडींग ची पडताळणी मंजूर भार व प्रत्यक्ष भार तपासणी.
देयकात नाव / पत्ता बदलणे किंवा दुरुस्ती.
थकबाकीदार ग्राहकास नोटीस देणे.
जास्त थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची भेट घेऊन देयक भरणा करण्याबाबत समजावून सांगणे.
ग्राहकांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत करणे.
नवीन जोडणी दिलेल्या ग्राहकास देयक सुरू झाले की नाही हे तपासणे.
वरीलपैकी सर्व समस्यांचे उद्या निवारण करण्यात येणार आहे तरी बहुसंख्यने ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टाकवे, फळणे, बेलज गावातील नागरिकांनी लाईटच्या संदर्भात समस्या असल्यास सोडवण्यासाठी आपण उपस्थित रहावे. असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
अशी माहिती महावितरणचे अधिकारी वडगाव मावळ अधिकारी विवेक सूर्यवंशी व शाम दिवटे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!