तळेगाव दाभाडे:
भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त सुकन्या समृद्धी योजना व ई श्रम कार्ड नोंदणी योजना शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पुजा करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी केले.आणि ई -श्रम कार्ड नोंदणी योजनेची माहिती व महत्व सांगितले.
पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना एका पुस्तकात आणुन ते पुस्तक प्रत्येक घरोघरी पोहचवणार आहोत अशी माहिती दिली.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घरकुल योजना,कन्यादान योजने संदर्भात माहिती दिली.


स्वतःचे घर नसलेल्यांना पंतप्रधान आवास योजने संदर्भात नगरपरिषदेच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन दिले.समृद्धी सुकन्या योजना सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात विशद केली.
वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांना सुचना करत प्रत्येक पदाधिकारी यांनी एका गरीब कुटुंबातील कन्येचे मामा समजून तिची सुकन्या समृद्धी योजनेचा हप्ता भरावा असे नियोजन करण्याचे आवाहन पदाधिकारी यांना केले.
शहर सरचिटणीस विनायक भेगडे यांनी तत्काळ उद्योगधाम येथील सहा कन्यांची योजनेचा हप्ता भरण्याची जबाबदारी स्विकारली.
पोस्ट सहकारी कैलास सांडभोर यांनी सुकन्या समृद्धी योजनेची विस्तृत माहिती उपस्थितांना सांगितली.
यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,गटनेते अरूण भेगडे पाटील,वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे, वडगाव युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,नगरसेविका शोभा भेगडे ,विभावरी दाभाडे, संध्या भेगडे.प्राची हेंद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस रविंद्र साबळे, विनायक भेगडे यांनी केले . आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रदीप ज्ञानेश्वर गटे यांनी मानले.


वीर जिजामाता कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे,संत ज्ञानेश्वर शाळेचे गाभणे सर,तळेगाव दाभाडे पोस्ट ऑफिसचे कर्मचारी कैलास सांडभोर यांचा सत्कार करण्यात आला.श्री.सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळेचे मुख्याध्यापक संजय चांदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास ई-श्रमीक कार्ड साठी कामगारांची व समृद्धी सुकन्या योजना लाभार्थी पालक व कन्या यांचीही संख्या लक्षणीय होती.प्रदिप गटे,रविंद्र साबळे,रजनी ठाकूर,अशोक दाभाडे,सचिन भिडे,अक्षय भेगडे ,सागर शर्मा,आतिष रावळे,अमित भागीवंत,पद्मभूषण डंबे,आनंद पूर्णपात्रे,अवधूत टोंगळे,ऋषीकेश सुतार,सतिष पारगे,राजन गुंड यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!