
निगडे:
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयएसओ प्रामाणित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त भाषणं केली यावेळी सरपंच सविता बाबुशा भांगरे ,उपसरपंच रामदास चव्हाण, शिक्षिका शिवदे मॅडम, आदिनाथ शिंदे, भगत मॅडम, निशा मुंडे, नीलम मखर तसेच अंगणवाडी सेविका पद्मा भागवत ,सुदेशना पाटारे उपस्थित होते.
अंगणवाडी मध्ये गरोदर महिलांना बेबीकेअर किट देण्यात आले. आठ महिलांना बेबीकेअर किट देण्यात आले हहे कीट देत असताना सरपंच सविता ताई बाबुशा भांगरे यांनी या किटचा व्यवस्थित वापर करा मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे






