पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न मावळात होतंय साकार १३९८ घरकुल योजनेचा शिवणे येथे भुमिपुजन सोहळा संपन्न
मावळ – मावळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आज १३९८ घरकुल योजनेचा भुमिपुजन सोहळा मा.सिद्धार्थ शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या हस्ते शिवणे येथे संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,मा.सभापती एकनाथ टिळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तसेच घरकुल लाभार्थींच्या वतीने अमोल शिवणेकर यांनी मनोगत केले.
या वेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे भाषनात बोलताना म्हटले कि “आम्ही जनतेशी बांधील आहोत दिलेला शब्द पुर्ण करु . या घरकुल योजनेसाठी बाळासाहेब घोटकुले यांनी विशेष मेहनत घेतली.
या वेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते माऊली शिंदे ,मा.सभापती ज्ञानेश्वर दळवी, मा सभापती राजाराम शिंदे, मा.सभापती निवृत्ती शेटे,सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्ता शेवाळे,मा. उपसभापती जिजाबाई पोटफोडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, ऍड. रविंद्रजी दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलकाताई धानिवले,मा.संचालक शिवाजी टाकवे, शिवाजी पवार, मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर उपसभापती शांताराम कदम,मा.अध्यक्ष प्रशांत ढोरे, महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, मा.सभापती सुवर्णा कुंभार, कल्याणीताई ठाकर,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, संघटक किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, पीएमआरडीए सदस्य कुलदीप बोडके, नितिन घोटकुले, कार्यध्यक्ष अर्जुन पाठारे, युवा मोर्चा संघटनमंत्री गणेश ठाकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी, गण अध्यक्ष नारायण बोडके, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संजय बेंनगुडे, प्रवीण शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत धनंजय टिळे, सरचिटणीस यादव सोरटे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!