नवलाखउंब्रे:
मनुष्य तेव्हाच सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त असेल. स्वस्थ शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने मनुष्याला मानसिक संतुष्टी ची प्राप्ती होते. कारण व्यायाम केल्याने त्याचे मन प्रफुल्लित, उत्साहपूर्ण आणि आनंदी राहते.
यासाठी नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गावातील महिला व पुरुषांसाठी भैरवनाथ महाराज व्यायामशाळा सुरू केली असल्याची माहिती सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांनी दिली
व्यायामाचे महत्व सांगत सरपंच चैताली कोयते म्हणाल्या,” इंग्रजीत एक म्हण आहे ‘हेल्थ इज वेल्थ’. या म्हणीचा अर्थ होतो की आरोग्य हीच संपत्ती आहे आणि हे आरोग्य व्यायाम केल्याने सुरळीत राहते.व्यायामाने खूप सारे लाभ होतात. व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्त्राव सुरळीत होतो, व्यायाम केल्याने शरीरात प्रफुल्लता वाढते आणि नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो.
पांडुरंग कोयते म्हणाले,” व्यायाम प्रत्येक दिवशी नियमित पद्धतीने करायला हवा. पश्चिमेकडील देशांमध्ये पुरुषांसोबत महिला देखील नियमित व्यायाम करतात. परंतु आपल्या भारतात खूप कमी ठिकाणी महिला घराबाहेर निघून व्यायाम करताना दिसतात. पुरुषासोबत महिलांनाही व्यायामाचे महत्व समजाऊन नियमित व्यायाम करण्यास प्रेरित केले पाहिजे. 


गावातील महिला, पुरुष ,युवक, विद्यार्थ्यांसह ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने धावणे,चालणे, योगासन, जीम, कवायती, सायकलिग, पोहणे या सारखे व्यायाम करून स्वतःला सुदृढ करावे असे आवाहन सरपंच चैताली कोयते यांनी केले.
आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप सारी नवीन नवीन साधने विकसित झाली आहे. या साधनांमुळे मनुष्याचे श्रमकार्य कमी झाले आहे. यामुळे मनुष्यामध्ये आळस वाढत आहे व तो व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक ग्रंथांचे मानने आहे की जर धन गेले तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो, मनुष्य हा धनाशिवाय जिवंत राहू शकतो.
परंतु जर स्वस्थ बिघडले तर आपले संपूर्ण जीवनच निरर्थक होऊन जाते. मनुष्याचे शरीर व मनाला शुद्ध करण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायामाचे सर्वात जास्त महत्व विद्यार्थी वर्गासाठी आहे. व्यायामाचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. म्हणून विद्यार्थीच नव्हे तर प्रत्येक वयाच्या लोकांनी नियमित व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवायला हवे.

error: Content is protected !!