कामशेत :
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून कामशेत बाजार पेठेतील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी दीड कोटी तसेच कामशेत मधील भूमिगत विद्युत वहिनीच्या कामासाठी ५८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भुमिपूजन करण्यात आले.
सरपंच रुपेश अरुण गायकवाड, उपसरपंच शिल्पा दौंडे, माजी उपसरपंच तानाजी दाभाडे, बाळासाहेब गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा, करण ओसवाल, आनंद टाटीया, सुभाष रायसोनी, सुभाष छाजेड, लालचंद चोपडा, ग्रामविकास अधिकारी विलास तुकाराम काळे, सागर ओसवाल, राजू बेदमुथा, बाळू धाडीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कामशेत शहर अध्यक्ष गजानन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य निलेश दाभाडे, परेश बरदाडे, दत्ता रावते, दत्ता शिंदे, अभिजित शिनगारे, विमल पडवकर, वैशाली इंगवले, कविता काळे, विजय दौंडे, मंगेश राणे, रणधीर यादव, आकाश टोपे, आदि उपस्थित होते.


कामशेत ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने तालुक्यातील नागरिकांची दररोज कामशेत बाजारपेठेत मोठ्या संख्येने वर्दळ असते. यामुळे कामशेत बाजारपेठेतील रस्ता वारंवार खराब होऊ नये या हेतूने आमदार सुनिल शेळके यांनी कामशेत बाजारपेठेतील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीमधून कामशेत बाजारपेठेतील गणपती चौक ते पंडित नेहरू विद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याची रुंदी ६.५ मीटर इतकी असणार असून उंची ८ इंच इतकी असणार आहे. तसेच कामशेत बाजारपेठेतील धोकादायक विद्युत खांब व विद्युत वाहक तारांची समस्या सोडविण्यासाठी कामशेत पोलीस ठाणे ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असून या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ५८ लक्ष २१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

error: Content is protected !!