कामशेत :
जागृती सेवा संस्था व महावीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त
विद्यमाने कामशेत येथील महिला व युवतींसाठी
आरोग्य सा्थी या संकल्पनेवर मोफत परिचारिका
प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले आहे. या
शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिला व युवतीना मोफत
प्रशिक्षण देले जाणार असल्याची माहिती
ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा यानी दिली
आहे.
या परिचारिका प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक प्रियंका माने, उपसरपंच शिल्पा दौंडे, ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा,कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या संस्थापिका कांचनबेन मुथा, ग्रामपंचायत सदस्या वैशाली इंगवले,कविता काळे,विमल पडावकर,सुनिता जोशी,वैशाली ढिले, डाॅ. नेहा ओव्हाळ, गणेश भोकरे,निलेश गायकवाड,,प्रल्हाद भवार, प्रतिक्षा तरळ, स्वाती खंडाते,विद्या मालपोटे ,कैलास परमार,देवीलाल भांबू, विदेश देसाई, कैलास परमार,राम खरात, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातील
तज्ञ मार्गदर्शक या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार
आहेत. तसेच प्रशिक्षणा नंतर शासकीय
प्रमाणपत्र देखील दिये जाणार असून नोकरीची
हमी महाविर हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणार
आहे. ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा यानी
मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत
आरोग्य सेवे बाबत महिला सक्षमीकरण, महिला
प्रशिक्षण हा शब्द मतदारांना दिला होता. हा शब्द
पूर्ण करण्याच्या हेतूने या प्रशिक्षण शिबिराचे
आयोजन केल्याचे मुथा यांनी सांगितले. प्रथम
नोंदणी करणाच्या आणि किमान दहावी पर्यंत
शिक्षण झालेल्या गरजूंना या शिबिरात संधी दिली
जाणार आहे.
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे,सेवा वृत्तीने या क्षेत्रात काम करणा-यांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहे. आरोग्य सेवेत झोकून काम करणा-यांना ही मोठी संधी आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रियंका माने म्हणल्या,” महिलांनी जबाबदारीने व प्रामाणिकपणाने काम केल्यास यश निश्चित मिळते, आपल्याला कायद्याची साथ आहे. कायदा आपल्या सोबत आहे.
ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा यांनी स्वागत केले. विद्या मालपोटे यांनी प्रास्ताविक केले. गणेश भोकरे यांनी सुत्रसंचालन केले वनिता वाघवले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!