वडगांव मावळ:
स्व.श्री. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट, वडगाव जैन सकल संघ, लायन्स क्लब ऑफ वडगाव
यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. सुषमा सुनील बाफना यांच्या पाचव्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिरात ७३ जणांनी रक्तदान केले.
वडगाव मावळ येथील जैन स्थानक शिबीर झाले.शिबीराचे उदघाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर होते.डॉ,सुनील बाफना यांनी उपस्थितांचे स्वागत केले
यावेळी अनंता कुडे अध्यक्ष भाजपा वडगाव, नगरसेवक किरण म्हाळस्कर ,विजय जाधव,प्रसाद पिंगळे,भाजपा वडगावचे माजी अध्यक्ष किरण भिलारे ,माजी सरपंच नितीन कुडे,प्रमोद म्हाळस्कर उस्थितीत होते .
प्रत्येक रक्त दात्यास आकर्षक पॉवर बँक ,ब्लूटूथ हेडफोन भेट दिली.
लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप मुथा, भूषण मुथा,अमोल मुथा नंदकिशोर गाडे,संतोष चेट्टी,बाळासाहेब बोरवके,
जैन सकल संघचेअध्यक्ष चंपलाल मुथा,अातिश कर्नावट,प्रितम बाफना ,प्रदीप बाफना ,सुभाष मुथा,उपस्थित होते.
रक्तदान शिबार समारोपास भास्करराव म्हाळस्कर उपस्थित होते. डॉ सुनील बाफना, वडगाव शहर भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष चेतन बाफना, मनोज बाफना, हर्षल बाफना, नवीन बाफना, आदेश बाफना, प्रज्वल बाफना, प्रथम बाफना यांनी शिबीराचे आयोजन केले.

error: Content is protected !!