मुंबई:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुंबईतील अनेक कामांचा त्यांनी उहापोह केला. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते.
 जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. २०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहेत असे त्यांनी सांगितले तसेच दिलेली बहुतांश वचने पुर्ण केली गेली आहेत असे ही ते म्हणाले .
पण डबेवाल्यांना दिलेले वचन मात्र पुर्ण होऊ शकते नाही ते कधी पुर्ण होईल याची आस प्रत्येक डबेवाल्याला लागली आहे.
गेल्या पांच वार्षिक मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या पाश्वभुमीवर शिवसेनेने मुंबईच्या डबेवाल्यांना काही आश्वासने दिली होती.


शिवसेनेच्या व्हिजन डॅाक्युमेंट मध्ये मुंबईतील डबेवाल्यांनसाठी नवी दिशा ज्या मध्ये.
• मुंबईतील डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणार.
•या कंपनीला पहिल्या वर्षी किमान ५ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ देणार.
•सायकल खरेदी/पार्किंगसाठी सहकार्य,मुलांचे शिक्षण,कुटुंबाला आरोग्यसेवा देण्यासाठी कार्पोरेट व सामाजिक विभागां मार्फत मदत,
• कार्यालयासाठी तसेच विश्रांतीसाठी मुंबईत डबेवाला भवन बांधणार.
अशी आश्वासने दिली आता पुन्हा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आल्या. पण डबेवाल्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याच्या काहीही हालचाल सरकारी पातळींवर होताना दिसत नाहीत.
डबेवाल्यांचे प्रलंबित प्रश्न लवकर लवकर मार्गी लावण्यासाठी “ मुंबई डबेवाला असोशिएशन” चे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन त्यांना आश्वसने पुर्ण करण्या बाबतचे निवेदन देईल.
डबेवाल्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वावर दृढ विश्वास आहे विलंब होईल पण डबेवाल्यांना दिलेली सर्व आश्वासन ते पुर्ण करतील अशी खात्री आम्हाला आहे असा विश्वास मुंबई डबेवाला असोशिएशन चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!