तळेगाव स्टेशन:
माझी वसुंधरा अभियानांतर्गत निगडेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पर्यावरण विषयी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलांनी खूप छान चित्र रेखाटली होती.
ग्रामसेवक शशिकिरण जाधव यांनी मुलांना खूप छान प्रकारे पर्यावरणाविषयी माहिती दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे यांनी मुलांना पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ही माहिती दिली. प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबुशा भांगरे यांनी माझी वसुंधरा या शब्दातच खूप काही आहे. माझं म्हणून सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेतली. तर त्याचे रक्षण करता येईल प्लास्टिकचा वापर न करता कागदी पिशव्यांचा वापर केला पाहिजे.


आणि प्रत्येकाने किमान दोन तरी झाडे लावली पाहिजे असे आव्हान सरपंच सविता भांगरे यांनी केले.आदिनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवदे मॅडम यांनी मुलांनी नुसतेच ऐकून न घेता पर्यावरणाची काळजी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे असे सांगितले.
यावेळी उपसरपंच रामदास चव्हाण शिक्षिका भगत , निशा मुंडे , नीलम मखर, पूजा भांगरे अंगणवाडीच्या शिक्षिका, पद्मा भागवत, सुनिता शेलार, सुदेश पाठारे, रुक्मिणी भांगरे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल मस्तुद यांनी आभार मानले.

error: Content is protected !!