टाकवे बुद्रुक:
कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर यांच्या विकास निधीतून टाकवे बुद्रुक येथील भैरवनाथ बैलगाडा घाटासाठी सहा लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला असून सभापती वायकर यांच्या शुभहस्ते घाटाचे भूमिपूजन करण्यात आले.
पंचक्रोशीतील सर्वात मोठा बैलगाडा घाट येथे असतो,त्या अनुषंगाने सर्व बैलगाडा शौकीन,गाडा मालक यांच्या मागणीनुसार घाटासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलाआहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पहिल्याच ह्या भैरवनाथ घाटासाठी निधी देण्यात आलेला आहे.अशी माहिती यावेळी सभापती वायकर यांनी दिली,


यावेळी सरपंच-भूषण असवले, गाडामालक नंदूशेठ असवले,माजी संचालक अंकुश आंबेकर,माजी सरपं दत्तात्रय पडवळ,युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे,मारुती असवले,षभाजी उपसरपंच रोहिदास असवले, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड,अनिल मालपोटे,शिवाजी जांभुळकर, पांडुरंग असवले,पंडित जाधव,सुनील दंडेल,सुयश सांगळे,सुहास वायकर,अक्षय रौंधळ,नवनाथ आंबेकर,महादू गुनाट,भाऊसाहेब गायकवाड, इत्यादी ग्रामस्थ प्रमूख पदाधिकारी,बैलगाडा शौकीन,गाडा मालक उपस्थित होते.

error: Content is protected !!