टाकवे बुद्रुक:
घोणशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ७५ वर्षाच्या लक्ष्मीबाई पालवे यांची बिनविरोध निवड झाली. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शना खाली ही बिनविरोध झाली. सरपंच अंकुश दादू खरमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप ग्रामपंचायत घोणशेतची उपसरपंचाचे निवडणूक घेण्यात आली होती.
या निवडणुकी करता उपसरपंच पदासाठी रुपाली रोहिदास गरुड , मच्छिंद्र बबन कचरे , सपना लक्ष्मण चोरघे , श्रीमती लक्ष्मीबाई सत्तू पालवे चार जणांचे नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये वैध ठरवण्यात आली .
अर्ज माघारी घेण्याच्या वेळेमध्ये रुपाली रोहिदास गरुड, मच्छिंद्र बबन कचरे ,सपना लक्ष्मण चोरघे या तीन जणांनी उमेदवार यांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे उपसरपंच पदाकरिता श्रीमती लक्ष्मीबाई सत्तू पालवे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला .


सरपंच अंकुश दादू खरमारे यांनी उपसरपंच पदी श्रीमती लक्ष्मीबाई सतू पालवे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने घोणशेत गावच्या उपसरपंच म्हणून निवडून आल्याचे जाहीर केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंकुश दादू खरमारे सरपंच यांनी काम पाहिले. तर निवडणूक सहाय्यक म्हणून गणेश ऐवळे ग्रामसेवक यांनी काम
येथून पुढील उपसरपंच पदाच्या निवडणूक या बिनविरोध होईल यात काय शंका नाही . उपसरपंच राष्ट्रवादीचे होणार असल्याचे सरपंच अंकुश दादू खरमारे
यांनी सांगितले.

error: Content is protected !!