तळेगाव स्टेशन:
नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान राबविले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. शाळा पातळीवर चित्रकला, रांगोळी, निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये प्रत्येक स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन क्रमांक काढले. उत्तेजनार्थ प्रत्येकी एक क्रमांक काढण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभ सरपंच चैताली पांडुरंग कोयते व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. चैताली पांडुरंग कोयते व उपसरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते करण्यात आले .सदर कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी कला सादर करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अलक बधाले, सविता बधले, आशा जाधव,तसेच माझी पंचायत समिती सदस्य ललिता ताई कोतु ल कर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोयते, शांताराम नरवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम शेटे तसेच केंद्रप्रमुख मीननाथ खुरसले सर, मुख्याध्यापक सुनिता येणारे,, ग्राम विकास अधिकारी प्रमिला घोडेकर सर्व प्राथमिक शिक्षक सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता गोगावले यांनी केले. आभार पांडुरंग कोयते यांनी मानले.

error: Content is protected !!