
वडगाव मावळ:
बळीराजाच्या हौसेची आणि आनंदाच्या बैलगाडा शर्यतीची पहिली बारी मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथील हिंदकेसरी बैलगाडा घाटावर धावणार आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने ही शर्यत रंगणार आहे. शनिवारी ता.१ला ही शर्यत असून या शर्यतीची जंगी तयारी सुरू आहे.
पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन होणार असून खासदार अमोल कोल्हे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या सह लोकप्रतिनिधी,बैलगाडा मालक,बैलगाडा शौकिन उपस्थित राहणार आहे. लाखो रूपयांची बक्षीसांची लयलूट केली जाणार असून प्रथम क्रमांकाच्या मानकरी बैलगाडा मालकास दुचाकी बक्षीस दिली जाणार आहे. सोन्याचे तोळे देऊन गौरव केला जाणार आहे.अखिल भारतीय बैलगाडा संघटना, मावळ तालुका मावळ तालुका शिवजयंती उत्सव समिती या शर्यतीसाठी राबत आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन
- गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला: सरपंच नामदेवराव शेलार
- शिवसेनेच्या वतीने तळेगावात निषेध सभेचे आयोजन
- संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत





