पुणे:
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाच्या वतीने आज पुणे जिल्हा परिषद येथे एकदिवसीय काम बंद आंदोलन व आक्रोश मोर्चा तसेच भजन मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळेस जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वाव्हळ, कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, राजेंद्र कांबळे उपाध्यक्ष , गणेश वाळुंजकर अध्यक्ष मावळ,.साधना धामणकर अध्यक्षा महिला मावळ,जयश्री शिवेकर उपाध्यक्ष महिला, मंदाबाई बोराडे,सुशिल वाडेकर, संदीप तिकोणे, उल्हास दळवी, राहुल तावरे प्रसिद्धी प्रमुख, सहादू पोटफोडे,, नारायण खाणेकर अध्यक्ष मुळशी, संतोष तुपे, सुखदेव गोपाळे, पोपट गायकवाड, आदी उपस्थित होते .
आंदोलन प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी १० ऑगस्ट २०२० किमान वेतन वाढीप्रमाणे वेतन कर्मचारी यांच्या खात्यावरती शासनाकडून जमा होण्यासाठी ग्रामविकास खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे असे सांगितले .


ग्रामपंचायत ५०%हिस्सा ग्रामपंचायती कडून देण्यात यावा यासाठी ग्रामपंचायतीला आदेश काढू असे आश्वासन दिले . १०% कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागितले आहे त्याप्रमाणे भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचारी आपघाती विमा व आरोग्य विमा काढण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आदेश देण्यात येईल. गठीत केलेला राहणीमान भत्ता मध्ये वाढ करण्यात येईल भविष्य निर्वाह निधीचे भरणा करण्यासाठी ग्रामपंचायतींना आदेश देण्यात येईल .सेवा पुस्तक आद्यावत करण्यात येईल अशा अकरा मागण्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत सोडवून करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. आभार गणेश वाळुंजकर अध्यक्ष मावळ तालुका व राजेंद्र वाव्हळ यांनी मानले.

error: Content is protected !!