कामशेत:
सायकलिंगच्या व्यायामातून शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते,या शिवाय हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षघात या सारखे आजार कमी होण्यास मदत होते, निरोगी राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते, या शिवाय इंधनाची बचत होते, आणि पार्किंगची समस्या घटते त्यामुळे सायकलिग करणा-या तरूण पिढीला प्रोत्साहन द्या असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले.
कामशेत पोलीस ठाण्याचे हवालदार अजय दरेकर यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकलिंग केली या बद्दल कामशेत पोलीस ठाण्याच्या वतीने दरेकर यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संजय जगताप, माजी उपसरपंच डाॅ.विकेश मुथा, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष दतात्रये वाल्हेकर,करण ओसवाल उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना डाॅ.विकेश मुथा यांनी सायकलिंग केल्यावर होणा-या आरोग्याचे महत्व सांगितले.


आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात.छोट्या छोट्या गोषींतूनही तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता. जसे की, सायकल चालवणे. तुम्ही जर नियमितपणे सायकल चालवली तर सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. तुम्ही जर आठवड्यातील ६ दिवस २० मिनिटे दररोज सायकल चालवली तर तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.
 ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी सायकलींग हा एक उत्कृष्ठ उपाय आणि व्यायामही आहे. शरीरातील कोर्डिसोल हॉर्मोन्सची मात्रा वाढणे हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. सायकलींगमुळे यावर प्रचंड परिणाम होतो.
फर्निश संशोधकांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ३० मिनिटे सायकल चालवणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते.
जर तुमचे वजन वाढत असेल. तर तुम्ही नियमितपणे सायकल चालवा फायदा होईल.
सायकल चालवणे सोपे असते, सायकलिंगमुळे पार्किंग समस्या होत नाहीत, वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक) होत नाही, जीवघेणे अपघातही होत नाहीत.
सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो.


सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते. सायकलिंगसाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती देशात जाणारा इंधनासाठी जाणारा राष्ट्रीय पैसा वाचण्यास मदत होते.
सायकल चालवण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होते.
इतर वाहनांच्या तुलनेत सायकल चालवण्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण कमी असून त्यामुळे एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीची काटकसरचं होते.अशाप्रकारे सर्व वयोगटातील लोकांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी सायकल चालवणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायाम प्रकार आणि वाहतुकीचे एक साधनही आहे.

error: Content is protected !!