पवनानगर:
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विठू माऊली सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण राक्षे यांच्या पुढाकारातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक हजार प्रतिमांचे वाटप करण्यात आले आहे.
पवन मावळ भागातील बहुजन बांधवांना या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. सप्ताहाची सुरुवात तिकोना पेठ, मळवंडी ढोरे, डोणे या गावांमधून झाली असून हा सप्ताह ३१ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून घरा घरापर्यंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचावे हा उद्देश मनाशी बाळगून हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाला समाजातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मोठया प्रमाणावर समाज बांधव उपस्थित राहत आहे.

error: Content is protected !!