कामशेत :
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून नाणे ते गोवित्री या नाणे मावळातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचे शुक्रवारी (दि.२४) भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी माजी सभापती गणपत शेडगे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, साईनाथ गायकवाड, विजय गायकवाड, देविदास गायकवाड, मधुकर वाघूले, नारायण मालपोटे, सरपंच संगीता ज्ञानेश्वर आढारी, उपसरपंच नितीन अंबिके, ग्रामपंचायत सदस्य संदीप आंद्रे,चारुशीला दत्तात्रय म्हाळसकर, पोलीस पाटील दत्ता वाल्हेकर,दत्तू आंद्रे, अनिल मालपोटे, दत्तात्रय म्हाळसकर, सोमनाथ आंद्रे, बाळू दळवी, बबनराव कोंढरे, संतोष कोंढरे, नितीन शेलार, नाथा झांबरे, नथू इंगवले, माऊली आंद्रे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


नाणे ते गोवित्री दरम्यानच्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी झाली नव्हती. यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती.तसेच हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावरून एकाचवेळी दोन मोठ्या वाहनांना जाताना अडथळा निर्माण होत होता. नाणे मावळातील वाढत्या पर्यटनाच्या दृष्टीने या भागातील पर्यटनास चालना देण्यासाठी या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याबरोबरच रुंदीकरण करणे गरजेचे होते. म्हणून आमदार सुनिल शेळके यांनी नाणे ते गोवित्री रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
नाणे ते गोवित्री दरम्यानच्या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची रुंदी वाढवून साडेपाच मीटर इतकी करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा साईटपट्ट्या देखील करण्यात येणार आहे. रस्ता ज्या ठिकाणी वारंवार खराब होतो किंवा खचतो अशा ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून उर्वरित रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामुळे नवीन होणारा रस्ता हा वाहतुकीसाठी सुखकर होणार आहे.

error: Content is protected !!