सोमाटणे:
पवन मावळ दिंडी समाज दिंडी सोहळ्याच्या
सडवली ते भिमाशंकर दिंडीचे प्रस्थान झाले. शुक्रवार दि. २४ ला सडवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिर ,श्रीराम मंदिर येथून हे प्रस्थान झाले.
संपर्क प्रमुख -महाराष्ट्र राज्य भाजपा ओबीसी वारकरी संप्रदाय संतोष दगडू कुंभार ,अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका अध्यक्ष ह.भ.प दत्ता महाराज शिंदे यांच्या हस्ते विणा पूजन झाले.
प्रस्थानाच्या वेळेस उपस्थित दिंडी सोहळा प्रमुख ह.भ.प शामराव महाराज फाळके( अध्यक्ष), श्री अनंता दत्तोबा रंधे, सहादु महादु खैरे, हनुमंत तुकाराम घारे, राजाराम लक्ष्मण ओझरकर, दत्तात्रय कारके, रामदास दत्तोबा ओझरकर, बबनराव बा. साळुंके, रमेश दा.ओझरकर,विष्णू बा. दाभाडे,हभप विलास महाराज दळवी, हभप नामदेव महाराज घारे, हभप शिवाजी कारके, किसनराव ढोरे, प्रकाश नंदू बदार, पांडुरंग महादू खैरे, अनिल घारे, मारूती फाळके तसेच महिला भगिनी ही उपस्थित होत्या.
प्रस्थानच्या वेळेस विणापुजन,मृदुंगपुजन, पताकापुजन, टाळपुजन करण्यात आले .सर्व वारकरी भाविक भक्त प्रस्थानाच्या वेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!