आळंदी:
श्री.विठ्ठल रखुमाई देवाच्या वर्धापनदिनानिमित्त मावळ तालुका दिंडी समाज धर्मशाळेत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मंगळवार दि.२८ डिसेंबरला प्रारंभ होणार आहे. काकडा आरती,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा, भजन,पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन,हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम आहेत. शनिवार दि.१ पर्यत हा सोहळा संपन्न होणार आहे.
अनुक्रमे अंकुश महाराज वाघीरे,पांडुरंग महाराज वारींगे,पांडुरंग महाराज गायकवाड,सुदाम महाराज काजळे यांची प्रवचने होणार आहेत.
महादू महाराज सातकर,दिलीप महाराज खेंगरे,ज्ञानेश्वर महाराज ठाकर,नाथा महाराज शेलार यांची किर्तने होणार आहेत.
रोहीदास महाराज धनवे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. मावळ तालुका दिंडी सोहळा समाजाचे अध्यक्ष नरहरी केदारी यांनी ही माहिती दिली.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे






