वडगाव मावळ :
श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू आहे. दि.१९.१२.२०२१ पासून सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. अखंड वीणानाद,काकड आरती,गाथा पारायण, हरिपाठ, किर्तन ,हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होत.आहे.
दि.१९.१२.२०२१ ते २६.१२.२०२१ या कालावधीत अनुक्रमे कन्हेरी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज कोकाटे, विनोदाचार्य शिवाजी महाराज बावस्कर ,गाथामूर्ती उमेश महाराज दशरथे ,भागवताचार्य अनिल महाराज पाटील,महंत समाधान महाराज भोजेकर,अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ ,वारकरी भूषण माऊली महाराज कदम, शांतीब्रम्ह गुरुवर्य मारूती बाबा कु-हेकर यांची कीर्तन होत आहे. या सोहळ्याचे भामचंद्र भक्तीत न्हाऊन निघत आहे.

error: Content is protected !!