गोडुंब्रे :
पवन मावळातील गोडुंब्रे येथील पवना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरपंच सागर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शरद सावंत, मारुती ओझरकर, ग्रामपंचायत सदस्य. दत्तात्रय चोरगे, महेश सावंत, संजय सावंत, कांचन आगळे, ग्रामसेविका रोहिणी खामकर, नितीन मुऱ्हे, बबन सावंत, हरीभाऊ सावंत, जालिंदर सावंत, उत्तम सावंत, संभाजी कदम, प्रकाश सावंत, प्रदीप सावंत, नागेश सावंत, विनय सावंत, धनंजय सावंत, अशोक सावंत, प्रमोद सावंत, पोपटराव आगळे, रोहिदास, कदम. आदि मान्यवर उपस्थित होते.

7
गोडुंब्रे येथील पवना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने या बंधाऱ्यात पाणी साठत नव्हते. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने कृषी पंपांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी या बंधाऱ्याची डागडुजी करण्याची आमदार सुनिल शेळके यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांनी केलेल्या मागणीची आमदार शेळके यांनी दखल घेऊन जलसंपदा विभागांतर्गत गोडुंब्रे येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून डागडुजी पासून वंचित असलेल्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊन दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

error: Content is protected !!