निगडे:
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निगडे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सरपंच सौ.सविता भांगरे,उपसरपंच रामदास चव्हाण,पोलीस पाटील श्री.संतोष भागवत,श्री.थरकुडे श्री.करपे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
सरपंच सविता भांगरे म्हणाले,” मागील चार वर्षात शाळेत झालेल्या अमुलाग्र बदलाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस पाटील श्री.संतोष भागवत यांनी पुढील काळात शाळेत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात तालुकास्तरावर प्राविण्य मिळवणारे सार्थक योगेश भांगरे व श्रेयस साहेबराव भांगरे या विद्यार्थ्यांचे खास कौतुक आणि त्यांचे सत्कार करण्यात आले.शाळेच्या वतीने पदवीधर शिक्षिका नीलम मखर मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका सौ.मंगल मस्तूद यांनी शाळेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल मान्यवरांना माहिती दिली.कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या उपशिक्षिका निशा मुंढे मॅडम व भगत मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री.अजिनाथ शिंदे सर यांनी केले. तसेच मान्यवरांचे आभार शिवदे मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!