टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ भागातील ५० गावातील प्रवासी नागरिकांसाठी पीएमपीएल बस सेवा सुरू करावी.तसेच टाकवे बुद्रुक ते निगडी व चाकण ते टाकवे बुद्रुक या मार्गाने बस धावावी अशी मागणी आंदर मावळातील प्रवाशांनी केली आहे.
टाकवे बुद्रुक सह अंदर मावळ मधील मावळातील पन्नास गावांची मुख्य बाजारपेठ असून या भागामध्ये औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक कामगार नोकरी करण्यासाठी या भागातून ये-जा करत असतात.
परिणामी एसटी महामंडळाचा अजून कोणताही तोडगा न निघाल्यामुळे अनेक प्रवासी नागरिक कामगार यांचे आतोनात हाल होताना दिसून येत आहेत.


तसेच भागामधील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, वैदयकीय अधिकारी, शालेय विदयार्थी, बँक कर्मचारी ग्रामपंचाय कर्मचारी, तलाठी, दूधवाले व जेष्ठ नागरिक आहेत. याशिवाय इतर अधिकारी व प्रवाशी आहेत. अनेक प्रवाशांना गाडी बदलून यावे लागते त्यामुळे कामास विलंब होतो. परिणामी प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अनेक प्रवासी नागरिकांची कामे खोळंबली आहेत तसेच वेळ व पैसा सुद्धा वाया जात आहे.
टाकवे बुद्रुक येथे सोमवारी आठवडे बाजार सुरु आहे. प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अनेक महिला व पुरुष बाजार घेण्यासाठी येत नाहीत, यामुळे फळ भाजी विक्रेत्यांचा मालक विक्री न झाल्यामुळे त्यांना तसाच टाकून द्यावा लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी सुद्धा या कारणाने अडचणीत आले आहेत.
पीएमपीएल वाहतूक विभाग पुणे व पिंपरी चिंचवड आपण आपल्या अधिकाराच्या स्तरावरती टाकवे बुद्रुक ते निगडी व चाकण ते टाकवे बुद्रुक .पी.एम.पी.एल बस लवकरात लवकर सुरू करून नागरीकांची गैरसोय टाळावे असे निवेदन पी.एम. पी. एल. वाहतुक विभाग पुणे प्रकाश ढोरे, पिंपरी चिंचवड, जनरल मॅनेजर,तसेच महापौर पुणे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके तालुका मावळ यांना निवेदने देण्यात आली आहेत.


आंदर मावळ प्रवासी कृती समितीचे अध्यक्ष राजू शिंदे, सरपंच बळीराम भोईरकर विकास असवले, मनोज जैन, शाळा समिती अध्यक्ष अनिल असवले, चंद्रकांत ससाने, व्यापारी संघटना अध्यक्ष योगेश मोढवे, योगेश शिंदे यांंच्या शिष्टमंडळाने ही निवेदने दिली.

error: Content is protected !!