निगडे:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत शासकीय नियमानुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नवलाखउंबरे केंद्रातील विद्यार्थ्यांच्या बालचित्रकला स्पर्धा निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धा विविध तीन गटांमध्ये पार पाडण्यात आल्या.स्पर्धेच्या उद्घाटनासाठी निगडे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सविता भांगरे तसेच उपसरपंच रामदास चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य सिताराम ठाकर, निगडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोपान ठाकर, नवलखउंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख खुरसुले साहेब तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते
.उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत ठाकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे सर यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी सरपंच सविता भांगरे यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो असे मत व्यक्त केले.तर उपसरपंच रामदास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे येथील सोनकांबळे सर यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये लहान गटात प्रथम क्रमांक अर्जुन संतोष सोनार (नवलाख उंबरे) ,द्वितीय क्रमांक समृद्धी दत्तात्रय ठाकर (निगडे-ठाकरवाडी)यांनी पटकावला. तर मध्यम गटात प्रथम क्रमांक सम्राज्ञी सिद्धार्थ साळवे(निगडे) आणि द्वितीय क्रमांक अजय दादाभाऊ ठाकर (कुरणवस्ती)यांनी संपादन केला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक सलोनी दशरथ गवारी (निगडे) व द्वितीय क्रमांक अरमान समीर काजी (कोयतेवस्ती)यांनी मिळवला. निकालाचे संकलन श्री.अजिनाथ शिंदे व श्री.भरत शेटे सर यांनी केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्रीनिवास शिंदे यांनी केले .तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे यांनी मानले.

error: Content is protected !!