नवलाखउंब्रे:
सामाजिक विकास निधीतून नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी कार्पोरेट विश्वातील कारखान्यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. नागरिकांनी या आरोग्यसुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांनी केले.
औद्योगिकनगरी असलेल्या नवलाखउंब्रे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी सरपंच चैताली कोयते यांच्या पुढाकारातून याॅर्क ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट इंडिया प्रा.लि. कंपनीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे,या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात कोयते बोलत होत्या. पाॅस्को टीएमसी कंपनीने वैद्यकीय साधन सामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्याचा ही नागरीकांना लाभ होणार असल्याचे कोयते यांनी सांगितले.
लोकार्पण सोहळ्यास असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट गुरूमुखसिंग,व्यवस्थापक अभिषेक ओझा,चीफ फायनान्स ऑफिसर विकास काडी, एच.आर. प्रकाश वाघ,राहुल गायकवाड,देव प्रिया मॅडम,उपसरपंच राहूल शेटे,ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच मयूर नरवडे,ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे अलका बधाले,सविता बधाले,आशा जाधव,सुवर्णा जाधव,ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर उपस्थित होत्या.
नवलाखउंब्रेसह बधलवाडी,मिंडेवाडी,जाधववाडी,चावसर वस्ती,कोयते वस्ती,एमआयडीसीतील रूग्णांना या रुग्णवाहिकेचा लाभ होणार आहे. निशुल्क सेवा दिली जाणार आहे. लवकरच सामाजिक विकास निधीतून उभारण्यात येणा-या आरोग्यमंदीराचा लोकार्पण सोहळा आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच कोयते यांनी दिली.

error: Content is protected !!